लाडकी बहीण योजना 6 व्या हप्त्याचे 1500 या महिलांच्या बँक खात्यात होणार जमा

Aaditi tatkare Ladaki Bahin विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर सरकारी कामांवर अंकुश लागतो. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात, अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार, महिला आणि बाल विकास विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबवला आहे. परिणामी निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळणार नाहीत. दरम्यान, राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्र दिले होते. आता ही योजना बंद होण्याची चर्चा सुरू झाली असताना महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी थेट डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची घोषणा केली आहे.

लाडकी बहीण योजना 6वा हप्ता लभार्थी यादी जाहीर

यादीत नाव पहा

केंद्रीय निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेचा निधी थांबविण्याचे निर्देश दिल्यानंतर काल (दि. १९ ऑक्टोबर) ही योजना बंद होणार असल्याची अफवा उठली होती. त्यानंतर सरकारकडून लागलीच त्यावर स्पष्टीकरण देण्यात आले.

लाडकी बहीण योजना 6वा हप्ता लभार्थी यादी जाहीर

यादीत नाव पहा

अदिती तटकरे यांनी १९ ऑक्टोबर रोजी रात्री एक्सवर पोस्ट करून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार” असे स्पष्टपणे म्हटले आहे. त्या पुढे म्हणाल्या, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै २०२४ पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा १,५०० रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२४ या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे. तसेच ४ ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील २ कोटी ३४ लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे.”

लाडकी बहीण योजना 6वा हप्ता लभार्थी यादी जाहीर

यादीत नाव पहा

सहावा हप्ता डिसेंबर महिन्यात मिळणार
“सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये, ही नम्र विनंती”, असेही अदिती तटकरे पुढे म्हणाल्या.

दरम्यान राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अदिती तटकरेंची पोस्ट शेअर करत या योजनेबद्दल मोठे Aaditi tatkare Ladaki Bahin विधान केले. राज्यातील महिलांनी भूलथापांना बळी पडू नये, असे ते म्हणाले. “या राज्याचा उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री या नात्यानं अतिशय जबाबदारीनं सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही. माझ्या भगिनींना, मायमाऊलींना विनंती आहे की, विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये”, अशी पोस्ट अजित पवार यांनी एक्सवर केली आहे.

 

https://x.com/iAditiTatkare/status/1847664795543011498

Leave a Comment